मुंबई-गोवा महामार्गावर जिते गावाजवळ भीषण अपघात

एकाचा जागीच मृत्यू, एक जखमी

| पेण | प्रतिनिधी |

मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्हयातील पेण तालुक्यातील जिते गावाजवळ रविवार दि.20 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 8ः30 च्या सुमारास एक गंभीर अपघात घडला. बुलेट मोटरसायक (क्रमांक एमएच 06 सीई 3360) वरून प्रवास करणारे वैभव वसंत चौहान (39), रा.कामोठे, पनवेल) आणि त्यांच्या पाठीमागे बसलेले दर्शन चंद्रकांत रहाटे (वय 38,रा.कोकण नगर, भांडुप) हे पेणहुन पनवेलकडे जात असताना हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात वाहनाने त्यांच्या बुलेटला मागून जोरदार ठोकर दिली. ज्यामुळे दर्शन रहाटे खाली पडले आणि त्यांच्या अंगावरून अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात दर्शन रहाटे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. वैभव चौहान यांना किरकोळ दुखापत झाली आहे. स्थानिक नागरिक आणि पोलीसांच्या मदतीने अपघातग्रस्तांना तात्काळ पेणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, परंतु वैदयकीय अधिकार्‍यांनी दर्शन रहाटे यांना मृत घोषित केले.
घटनेनंतर पोलीसांनी अपघातग्रस्त वाहन वाजूला करून वाहतूक सूरळीत केली. संबंधित अज्ञात वाहनाचा शोध व घटनेचा तपास पेण पोलीस करत आहेत.

Exit mobile version