। खोपोली । प्रतिनिधी ।
मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवर गुरुवारी (दि.26) माल घेऊन जाणाऱ्या ट्रकचे तीन टायर फुटल्याने ट्रकने समोरील सुरक्षा कठड्याला जोरदार धडक दिली. या दरम्यान ट्रक मधील माल दुसऱ्या ट्रक वर आणि पुणे लेन वर पडल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ट्रक मधील दोन्ही चालक जखमी झाले आहे. तर ट्रक मधील पत्र्याचे ब्लॉक पुणे लेन वर पडल्याने पुण्यकडील वाहतूक काही काल थांबविण्यात आली होती.
मुंबई -पुणे एक्सप्रेसवेवरून ट्रक चालक लाखा इकबाल (38) रा. जामनगर गुजरात हा ट्रकमधील माल घेऊन पुण्यावरून मुंबई कडे जातं असताना तो बोरघाट पोलीस चौकी जवळ आला असता ट्रकचे उजव्या बाजूचे दोन टायर तर डाव्या बाजूचा एक टायर फुटल्याने ट्रकने समोरील कठड्याला जोरदार धडक दिल्याने ट्रक मधील पत्र्याचे ब्लॉक पुणे लेन वर तर दुसऱ्या ट्रक वर पडून भीषण अपघात झाला. या ट्रक मधील माल पुणे लेन वर पडल्याने काही काल पुण्याकडील वाहतूक बंद केली होती तर दोन्ही ट्रक मधील चालक जखमी झाले असून, त्यांना तात्काळ बाहेर काढून लोणावळा येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, तर जेसीबीच्या साहाय्याने ब्लॉक बाजूला घेऊन रस्ता वाहतुकीसाठी चालू करण्यात आला आहे.







