| खोपोली | प्रतिनिधी |
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर खोपोलीजवळ कंटेनर ने मुंबईकडील लेन सोडून पुणे बाजूकडील लेन वर येऊन पलटी होवून भीषण अपघात झाला आहे. यात दोघांचा मृत्यू झाला असुन चार जण जखमी झाले आहेत.

आज सोमवार दि.21 सकाळी 09.00 वाजताच्या सुमारास कंटेनर (MH-46-AR-0181) पुण्याकडून मुंबईकडे जात असताना किलोमीटर 35 जवळ सदर कंटेनर ने मुंबईकडील लेन सोडून पुणे बाजूकडील लेन वर येऊन पलटी झाला. सदर अपघातात एकूण 5 छोट्या कार बाधित झाल्या असून सुझुकी डिझायर कार (MH-48-A-6512) या कारमधील चालक व एक महिला असे दोघेजण जागीच मयत झालेले आहेत. सदर कार मधील दोन जखमी महिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच, इतर कार मधील दोन महिला जखमी असून त्यांना देखील एमजीएम रुग्णालय कामोठे येथे दाखल केले आहे.

मुंबईकडे जाणाऱ्या लेन वरून वाहतूक सुरळीत सुरू आहे. पुणे दिशेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने असून अपघात झालेली वाहने बाजूला काढताना काही वेळासाठी वाहतूक थांबवण्यात आलेली होती. आता यावेळी वाहतूक सुरळीत करण्यात येत आहे.