| खोपोली | वार्ताहर |
मुबंई पुणे एक्सप्रेसवेवर पहाटे एका आयसर टेम्पोने समोरील टेम्पोला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. यात क्लीनरचा जागीच मृत्यू झाला आहे.
पुण्याहून मुबंईकडे माल घेऊन जात असताना तो बोरघाटात ढेकू हद्दीत आला असता टेम्पो चालक संतोष पटकन शेट्टी ( 27, रा. धारवाड कर्नाटक हा टेम्पो घेऊन आला असताना त्याचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने त्याने समोरील दुसऱ्या लेन वर चालणाऱ्या भारत बेंज टेम्पोला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात टेम्पोची केबिन पूर्णपणे दबल्याने त्यात अडकून क्लीनर गुरुसिदा (25) याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलीस, बोरघाट महामार्ग पोलीस, आयआरबी टीम, देवदूत यंत्रणा अपघातग्रस्त टिमचे सदस्य तात्काळ घटनास्थळी दाखल होत, टेम्पोमध्ये अडकेलेल्या क्लीनरला तात्काळ बाहेर काढून अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून एक्सप्रेसवे वाहतूकिसाठी खुला करण्यात आला.