समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; तीन ठार, चार जखमी

। छत्रपती संभाजीनगर । वृत्तसंस्था ।

समृद्धी महामार्गावर अपघाताच्या घटना चालूच असताना पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. बोलेरो कार ट्रकला धडकल्याने भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर चार गंभीर जखमी आहेत.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर जांबरगाव येथील आयशर ट्रक समृद्धी महामार्गावरुन छत्रपती संभाजी नगरच्या दिशेने जात होता. पाठीमागून वेगात येणाऱ्या बोलेरो कारने आयशर ट्रकला मागून जोरात धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, यामध्ये बोलेरो कार एक ते दीड किलोमीटर अंतरावर फेकली जाऊन बोलेरोचा अक्षरश: चुरडा झाला. या कारमध्ये आठ प्रवासी असून एकाच कुटुंबातील तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ वैजापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Exit mobile version