| यवतमाळ | प्रतिनिधी |
समृद्धी महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. यात 2 जण जागीच ठार झाले आहेत. तर 3 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. समृद्धी महामार्गावर भरधाव पिकअप मालवाहू वाहनाने अचानक ब्रेक लावल्याने भरधाव कारने मागून धडक दिल्याने भीषण अपघाताची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ येथून देवदर्शनासाठी शिर्डी येथे जाणाऱ्या भाविकांच्या कारचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या घटनेत दोन जण जागीच ठार झाले तर दोन जण जखमी झाले. ही घटना गुरुवारी (दि. 11) रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. चौघेजण यवतमाळ येथून शिर्डी येथे देवदर्शनासाठी जात होते. त्यांचा समृद्धी महामार्गावरील धनज बुद्रुक पोलीस स्टेशनच्या हद्दीतून प्रवास सुरू असताना त्यांच्या वाहनासमोर धावणाऱ्या बोलेरो पीकअप मालवाहू वाहनाने अचानक ब्रेक मारले. त्यामुळे भरधाव वेगात धावणारी कार अनियंत्रित होऊन या पिकअपवर धडकली. ज्यात कार चालक मंगेश व विक्रम सौरगपते (40) रा. यवतमाळ यांचा जागीच मृत्यू झाला. तर अनुकूल मनोज यादव (35), रा.दत्त चौक यवतमाळ व मयूर दीपक डोनाडकर (29), रा.दत्त चौक यवतमाळ हे गंभीर जखमी झाले. सदर घटनेचा पुढील तपास सुरु आहे.
समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात; दोघा जणांचा मृत्यू
