| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान या पर्यटनस्थळी माणसे माणसाला ओढणारी अमानवी प्रथा बंद व्हावी म्हणून पर्यावरणपूरक ई-रिक्षा सुरु करण्यात आल्या आहेत. शासनाने माथेरान नगरपरिषदेकडून ठेकेदार पद्धतीने सात ई-रिक्षा खरेदी करून त्यांच्या माध्यमातून पायलट प्रकल्प राबविला. मात्र, काळापासून हातरिक्षा ओढणारे रिक्षाचालकांना ई-रिक्षा चालविण्यासाठी देण्यात आल्या असून, खर्या अर्थाने श्रमिक ई-रिक्षाचे चालक बनले आहेत. दरम्यान, माथेरान पालिकेने सरकारी निधीमधून खरेदी केलेल्या सात रिक्षा नवीन पायलट प्रकल्पामुळे सायडिंगमध्ये लावण्यात आल्या आहेत. दरम्यान, पुढील सहा महिने या ई-रिक्षा सायडिंगमध्ये राहणार असल्याने त्या ई-रिक्षा भंगारात जाण्याची शक्यता आहे.