हभप हरिभाऊ रिंगे यांचा सत्कार;प्रसिद्ध गायक महेश काळे यांची उपस्थिती

। पोलादपूर । वार्ताहर ।
वारकरी संप्रदायातील थोर गायक हभप हरिभाऊ रिंगे महाराज यांना 80 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर येथे ज्येष्ठ भाजनसम्राट अनुप जलोटा, सुप्रसिद्ध गायक महेश काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे हे उपस्थित होते. कार्यक्रमात यावेळी नादब्रह्म विशेषांक, नादवेध दिनदर्शिका, वारकरी दर्पणच्या हरिभाऊ रिंगे विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. अभंगनाद या भजनसंध्या कार्यक्रमात गायक गणेश कळंबे, सागर उतेकर, सतिष कळंबे, ज्ञानेश्‍वर कदम, गणेश कुलये, सीतारामबुवा कळंबे, युवराज कळंबे, अविनाश रिंगे, चिन्मय रिंगे तर पखवाज वादन सुप्रसिद्ध मृदंगमणि सुनिल मेस्त्री आणि बंडाराज घाडगे यांनी केले. बंडाराज घाडगे यांनी केले, तर सूत्रसंचालन सचिन महाराज पवार यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन ईश्‍वरी मल्टिग्राफिक्सच्या वतीने मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे आणि ज्येष्ठ पत्रकार संजय घावरे यांनी केले होते. राजू रिंगे, ज्ञानोबा दाभेकर, योगेश रिंगे, आदेश महाराज रिंगे, निखिल मालुसरे, ओमकार घावरे यांनी विशेष मेहनत घेतली.

Exit mobile version