महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

। कर्जत । वार्ताहर ।
कर्जत पोलिस ठाण्याच्या महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिता शंकर अथने व पोलीस नाईक सचिन पमू नरुटे यांना 50 हजाराची लाच स्वीकारताना नवी मुंबई येथील लाललूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. याबाबतची सविस्तर हकीकत अशी तक्रारदार याचे सासू-सासरे, मेव्हणे व इतर यांच्याविरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 109/2022 अन्वये गुन्हा दाखल आहे, सदर गुन्ह्यातील तक्रारदार यांच्या तीन मेहुण्यांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयीन कोठडी आदेश करण्यात आले आहे, कर्जत पोलीस ठाण्याच्या लोकसेविका महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिता अथने यांनी तक्रार यांचे तीन मेहुणे यांना जामीन मिळण्यासाठी मदत करण्याकरिता तसेच गुन्ह्यातील इतर पाहिजे असलेले 12 जणांना गुन्ह्यात अटक न करता नोटीस देवून सोडण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 1 लाख रुपये रकमेची मागणी करून त्या पैकी 50 हजार रकमेची लाच ची मागणी करून त्यापैकी 10 हजार रुपये रकमेची लाच स्वीकारली असल्याबाबतची तक्रार नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागात 19 एप्रिल 2022 रोजी दिली होती.

19 एप्रिल 2022 रोजी तक्रारदार यांनी कर्जत पोलीस ठाण्याच्या महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिता अथने यांनी तक्रारदार यांच्या कडे 1 लाख रुपये रकमेची मागणी करुन तडजोडी अंति 50 हजार रुपयांची रकमेची लाच ची मागणी केल्याचे निष्पन्न झाले, त्यानुसार आज दि. 20 एप्रिल 2022 रोजी महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिता अथने व पोलीस शिपाई सचिन नरुटे यांनी तक्रारदार यांच्याकडून 50 हजार रुपये रकमेची लाच कर्जत पोलीस ठाणे येथे स्वीकारल्या बद्दल त्यांना नवी मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलेआहे.

Exit mobile version