महिला पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| पनवेल | वार्ताहर |

नवी मुंबई पोलिस दलातील महिला पोलिस हवालदार अश्विनी चिपळूणकर यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. कळंबोली सेक्टर-1 येथील सत्यम पॅराडाईज इमारतीत त्या राहत होत्या. त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना मेडिकव्हर रुग्णालयात दाखल केले होते. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांना दोन मुले असून, एक दुबईत कामाला आहे. तर दुसरा शिकतोय. 1999 साली त्या पोलिस खात्यात भरती झाल्या होत्या.

Exit mobile version