अलिबागमध्ये खत प्रक्रिया प्रशिक्षण

। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग नगरपरिषद व ईकोसत्व ईन्व्हारमेंटल सोल्युशन प्रा. ली. यांच्या संयुक्त विद्यमाने द.इंक्युबेशन नेटवर्क व सेकंड म्युस यांच्या सहकार्याने अलिबाग शहरामध्ये नगराध्यक्ष प्रशांत नाईक व मुख्यधिकारी अंगाई साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली रामनाथ येथे गावदेवी मंदिर जवळील गार्डन येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेमध्ये घरातुन निघणार्‍या ओल्या कचर्‍यापासून कंपोस्ट खत कसे तयार करावे यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. ओला कचरा म्हणजे काय भाज्यांची देठे, फळांच्या साली, किचन मधील खरकटे याचा वापर करून आपण उत्तम प्रतीचे खत तयार करु शकता व आपल्या झाडांना घालु शकतो. याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच हे तयार झालेले खत आपण आपल्या कुंड्यांना /परसबागेतील झाडांना घालून आपली परसबाग फूलवू शकतो अशी माहिती देऊन कंपोस्ट खत करणार्‍या नागरिकांना नगरसेवक राकेश चौलकर, संजना किर, सुषमा पाटिल यांच्या हस्ते खत प्रकल्प चालू करणारे नागरिकांना कल्चर पावडरचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित अलिबाग नगरपरिषदेचे नगरसेवकराकेश चौलकर, संजना किर, सुषमा पाटिल, व्हिडीके सुपरवाइजर प्रथमेश गोरे, शहरातील कंपोस्ट खत करणारे नागरिक व ईकोसत्व प्रकल्प प्रमुख संतोष राखेमल्लू, नदीम खान व इकोसत्व प्रतीनिधी रेश्मा ढावरे, पूजा पिंगळे, नैना ढोरे व परिसरातील नागरिक होते.

Exit mobile version