रोटरी क्लब पाताळगंगाचा स्तुत्य उपक्रम
विजर्सनस्थळी ठेवण्यात आले निर्माल्य कुंड
| रसायनी | वार्ताहर |
रसायनी परिसरातील पाताळगंगा, रीस नदीच्या काठावर गणेशोत्सवाच्या दिवशी रोटरी क्लब पाताळगंगाच्या वतीने निर्माल्य कुंड ठेवण्यात आले होते. दीड, पाच आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी जवळपास 10 ते 15 टन निर्माल्य जमा झाले असून, त्यापासून कंपोस्ट खताची निर्मिती करण्यात येणार आहे. त्या खताचा बागकामासाठी वापर केला जाईल, अशी माहिती रोटरीच्या अध्यक्ष रेश्मा कुरुप यांनी दिली.
याबाबत रोटरी क्लब पाताळगंगा अध्यक्ष रेश्मा कुरूप यांनी माहिती दिली की, गणेश विसर्जनाच्या दिवसांत, सुमारे 10 टन फुले गोळा करू शकलो आणि तो नदीत फेकण्यापासून वाचवू शकलो. आम्ही हे सर्व निर्माल्य एका खड्ड्यात टाकले आणि त्याचे कंपोस्टमध्ये रूपांतर करू जे नंतर बागकामासाठी वापरले जाईल.
यावेळी अध्यक्षा रेश्मा कुरूप, सचिव सुशांत उचील, रोट्रॅक्टरचे अध्यक्ष अनिकेत तायशेटे व टीम, सुनील कुरूप, गणेश काळे, शशिकांत शानभाग, अमित शहा, मेघा कोरडे, गणेश म्हात्रे, देवेंद्र महिंद्राकर, डॉ.धीरज जैन, शारदा काळे, आशु गर्ग, सुनील भोसले, रुतुजा भोसले, राजू बोराडे, विजय पाटील, राम गाताडे, डॉ. लेखा उचील, सुशांत जगनाडे, मित्तल शहा, भारती म्हात्रे, रमाकांत कोरडे, रश्मी गर्ग, डॉ. स्वीटी जैन या प्रकल्पात सहभागी झाले होते. अध्यक्षा रेश्मा कुरूप यांनी या प्रकल्पास उपस्थित असलेल्या सर्व सदस्यांचे तसेच या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सहकार्य केल्याबद्दल पोलीस विभाग आणि ग्रामपंचायतीचे आभार मानले.