कल्याण | प्रतिनिधी |
कल्याण पश्चिमेच्या रामबाग परिसरात दुकानांना भीषण आग लागली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या आगीत विविध पक्षी, प्राणी आणि मासे मृत्यूमुखी पडले. या आगीत विविध पक्षी, प्राणी आणि मासे मृत्यूमुखी पडले. या दुकानांमध्ये लव्हबर्ड्स, कबुतरे, ससे आणि माशांची विक्री केली जायची. आज सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास या दुकानांना आग लागली. याची माहिती कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाला देण्यात आली.
या आगीने अवघ्या काही मिनिटांतच रौद्ररूप धारण केल्याने दुकानातील अनेक पक्षी, ससे आणि माशांचा होरपळून मृत्यू झाला. तर घटनास्थळी पोहोचून अग्निशमन दलाने तातडीने आगीवर नियंत्रण मिळवले.