देवेंद्रनाथचा सभासदांना पंधरा टक्के लाभांश

| अलिबाग | प्रतिनिधी |

देवेंद्रनाथ नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा डोंगरे हॉल, सार्वजनिक वाचनालय, अलिबाग येथे संपन्न झाली. संस्थेला आर्थिक वर्षाकरिता 28,01,897.65/-इतका नफा झाला असून, सभासदांना पंधरा टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची घोषणा अध्यक्ष अशोक प्रधान यांनी यावेळी केली.

सभेमध्ये 10 वी, 12 वी व पदवी तसेच पदव्युत्तर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. संचालक सचिन शांताराम ढवळे यांची अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघावर जिल्हा सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपाध्यक्षा ज्योत्स्ना तांडेल, सचिव महेश कर्णिक, संचालक मकरंद कर्णिक, तेजस्विनी प्रधान, सीमा सोनी, विजय जैन, सचिन ढवळे, वैभव प्रधान, डॉ. विनायक पाटील, राजेंद्र होळीकेरी व तज्ञसंचालक सतीश प्रधान उपस्थित होते.

पतसंस्थेतर्फे रक्तदान शिबीर
पतसंस्थेच्यावतीने डोंगरे हॉल येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. उद्घाटन डॉ. विनायक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रक्तपेढीचे डॉ. गोसावी अध्यक्ष, अशोक प्रधान व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. शिबिरामध्ये 57 नागरीकांनी रक्तदान केले.
Exit mobile version