| रसायनी | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत रसायनी येथील वडगाव ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत मागील घरपट्टी व पाणीपट्टीसहित चालू घरपट्टी व पाणीपट्टी भरणे आवश्यक असल्याने ग्रामपंचायत अधिकारी सुहास वारे यांनी अभियानानूसार 50 टक्के सूट जाहिर केली आहे. या ग्रामपंचायतीवर विनोद चांदोरकर प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. ही सूट फक्त निवासी संकूलाच्या घरपट्टी आणि पाणी पट्टीवर लागू असेल. त्यामुळे अनेक थकबाकी धारकांना दिलासा मिळाला आहे. या योजनेची मुदत ही 31 डिसेंबरपर्यंतच लागू असल्याने जास्तीत जास्त लोकांनी या योजनेचा फायदा घ्यावा, असे वडगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे.







