भाजप-शिवसेनेत पुन्हा राडा

जलतरण तलावाच्या श्रेयवादाचे राजकारण
| मुंबई | वृत्तसंस्था |

मुंबईतील कांदिवलीमध्ये सरदार वल्लभभाई पटेल जलतरण तलावाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावरुन शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा एकदा मोठा गदारोळ झाला. शनिवारी हा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. तलावाच्या श्रेयवादावरुन जोरदार राडा होऊन दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याचे दिसून आले.

कांदिवलीत सरदार वल्लभभाई पटेल जलतरण तलावाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम उद्या 20 फेब्रुवारीला भाजपचे आमदार योगशे सागर यांच्या हस्ते पार पडणार होता. पण, त्याआधीच शनिवारी शिवसेनेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. याच मुद्द्यावरुन भाजपचे आ. योगशे सागर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंचावरही गदारोळ झाला. शिवसेनेचे काही नेते आणि नगरसेवक आणि आमदार योगेश सागर आमनेसामने आले. त्यातून कार्यकर्त्यांमधील संघर्ष वाढला. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते घोषणाबाजी करु लागले. पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात करण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात आले. पण, कार्यकर्ते ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हते.

Exit mobile version