पनवेल | वार्ताहर |
पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या दोन महिलांनी पोलिस ठाण्यात एकमेकींना मारामारी केल्याचा प्रकार पनवेल तालुका पोलिस ठाण्यात घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही महिलांविरोधात शांततेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आयेशा शेख व फैमदा शेख यांच्या कुटुंबीयांमध्ये काही वर्षांपासून प्रॉपर्टीवरून वाद सुरू आहे. याच वादातून त्यांच्यामध्ये नेहमी भांडणे होत असल्यामुळे त्यांनी एकमेकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. आयेशा शेख आणि फैमदा शेख या दोघींमध्ये याच कारणावरून पुन्हा वाद होऊन भांडण झाले. त्यामुळे पोलिसांनी दोघींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.