नगर आग प्रकरणी बांधकाम अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करा – पंडित पाटील

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
ऐन दिवाळीला नगर येथील आरोग्य केंद्राला आगीमुळे अनेक जीव होरपळून गेले. गेल्या दोन वर्षात सातत्याने असें प्रकार घडत आहेत. अशा घटनेत मेल्यानंतर 5-5 लाख नुकसान भरपाई देण्या पेक्षा अगोदरच देखभालीसाठी खर्च केले असते तर ही वेळच ओढवली नसती. महाराष्ट्रातील 32 जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर आहे. अलिबागची आरोग्य यंत्रणा देखील निधी अभावी तकलादू झाली आहे. 5-5 लाख रुपये जीव गेल्यानंतर नुकसान भरपाई देण्यापेक्षा महाराष्ट्र शासनाने आग प्रतिबंधक यंत्रणा असावी, ऑडीट करणे यावर खर्च कराव्यात. म्हणजे अन्य ठिकाणी आशा दुर्घटना घडणार नाही. मुंबई, नाशिक अशी अनेक ठिकाणी गॅस गळती, आग आशा घटना घडल्या आहेत. त्यानंतर थातूर मातूर उत्तरे देऊन लोकांची दिशाभूल करण्यापेक्षा सरकार काय काम करतेय, यावर कोणाचा अंकुश आहे। मेल्यानंतर विभागीय आयुक्तांची चौकशी ने काही होणार नाही
बांधकाम विभागाचे सचिव, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, यांच्यावर कारवाई करा. त्यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा. अशी मागणी पंडीत पाटील यांनी केली आहे.

Exit mobile version