‘हा’ व्यवसाय करणार्‍याविरूद्ध गुन्हा दाखल

पनवेल | वार्ताहर |
कामोठे वसाहतीमध्ये बेकायदेशीररित्या वैश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्मिता जाधव यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने छापा टाकून कारवाई केली आहे. कामोठे वसाहतीमध्ये से.-36 अक्षर बिल्डींगजवळ यातील आरोपी हे संगनमत करून एका 26 वर्षीय पीडित महिलेशी संपर्क करून तिला वैश्या गमनासाठी येथे बोलावून तिच्याकडून वैश्या व्यवसाय करून घेऊन त्याबाबतचा मोबदला स्वीकारून पीडितेच्या कमाईवर उपजीविका भागवत असल्याची माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी बोगस गिर्‍हाईक पाठवून त्यानंतर त्याठिकाणी विशेष पथकाने छापा टाकून मारूती स्विफ्ट गाडी, मोबाईल फोन, रोख रक्कम व इतर ऐवज असा मिळून जवळपास 2,54,000 चा ऐवज हस्तगत केला आहे. याबाबत दोघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Exit mobile version