खोपोली | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यातील ज्योती स्टिल कारखान्यात काम करणार्या महिला सहकारीचा विनयभंग तसेच तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करणार्या दिवाकर ओझा (रा. बोनझ्रर सोसायटी के 306 ताकई, पो. साजगाव, ता. खालापूर) विरोधात पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पीडिता ही खोपोली शहरात राहणारी असून, ज्योती स्टिल कारखान्यात उच्च पदावर काम करीत होत्या. दिवाकर ओझा हा प्लांट मॅनेजर असून, ओझा याला कामाचा अहवाल देण्याचे काम पीडितेचे होते. गेल्या सहा महिन्यांपासून ओझा पीडितेला सातत्याने शारीरिक व मानसिक त्रास देत होता. तसेच शरीरसुख दिल्यास पगार वाढ देण्याचे आमिष ओझा पीडितेला दाखवत होता. पीडितेनी विरोध केल्याने ओझाने तिला त्रास देत नोकरी सोडण्यास भाग पाडले. असह्य झाल्यावर पीडितेने सर्व प्रकार घरी सांगितला. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देेण्याचा निर्णय घेऊन दिवाकर ओझाविरोधात खोपोली पोलीस ठाणे तक्रार देण्यात आली. ओझाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दिवाकर ओझा याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. अधिक तपास सपोनि एस. काळसेकर हे करीत आहेत.