अनधिकृत संस्था चालवण्याप्रकरणी गुन्हा दाखल

। पनवेल । वार्ताहर ।
खारघर येथे अनधिकृत संस्था चालून 19 अल्पवयीन मुलींच्या निवासाची व्यवस्था केली म्हणून खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खारघर, सेक्टर 12 येथे जीवन सच सामाजिक संस्था अनधिकृतपणे चालविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विनीत म्हात्रे यांना समजली होती. त्यानुसार संस्थेत जाऊन पाहणी केली असता एकूण 24 मुलींना संस्थेत निवासी ठेवून त्यांची देखभाल करून त्यांना शाळेत पाठवून शिक्षण पूर्ण करण्याचे काम होत असल्याचे आढळून आले. यावेळी सनी अँड्रूज यांना जीवन सच संस्थेने बाल न्याय अधिनियम 2015 अंतर्गत मान्यता प्रमाणपत्र घेतले आहे का याची विचारणा केली. या वेळी कोणतेही प्रमाणपत्र त्या सादर करू शकले नाहीत. 24 मुलींपैकी 19 मुली या अल्पवयीन असल्याने त्यांना मान्यताप्राप्त संस्था खारघर येथे सुरक्षित निवार्‍या करता ठेवण्यात आले. सनी याना संस्थेची कागदपत्रे सादर करण्यास मुदत देण्यात आली होती. मात्र त्यांनी प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यामुळे सनी अँड्रॉज आणि जीवन सच संस्था यांनी बालकल्याण विभागाकडे नोंदणी करणे बंधनकारक असताना तसे कोणतेही नोंदणी न करता अनधिकृत संस्था चालवली. त्यामुळे खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Exit mobile version