। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
तालुक्यातील वरसोली येथील समुद्रात पॅरासेलिंग करताना दोर तुटल्याने झालेल्या दुर्घटनेत दोन महिला पाण्यात पडल्या होत्या. याप्रकरणी अलिबाग पोलिस ठाण्यात पॅरासेलिंग बोटच्या मालकांसह दोघाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरसोली येथील समुद्रात 27 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 च्या सुमारास मुंबई साकीनाका येथून आलेल्या महिला पर्यटक यां ना बोटीवरून पॅरासेलिंग करीता समुद्राचे खोल पाण्यात नेवून, सदर महिला पर्यटक या पॅरासेलिंग बोटवरून पॅरासेलिंग करत असताना, बोट मालकाचे हयगईमुळे पॅराशुटचे कपलींग मधील दोर निघून तो तुटल्याने पर्यटक महिलांची सुरक्षितता धोक्यात आणल्याबाबतचा गुन्हा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक एच.एस.पाटील हे करीत आहेत.