| पेण | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील प्रतिष्ठेची आणि आर्थिकदृष्टया सबळ असणारी ग्रामपंचायत म्हणजे वडखळ ग्रामपंचायत. या ग्रामपंचायतीवरील हुकूमशाही मोडून काढण्याच्या दृष्टीने श्री क्षेत्रेश्वर जनमत विकास आघाडी एकवटली आहे. बुधवारी या आघाडीकडून सरपंचपदाच्या उमदेवार शिवानी विश्वास म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत निलेश पांडूरंग म्हात्रे, योगेश पाटील, सुनिल जांभळे, मिलींद मोकल, योगिता रवी मोकल, मत्स्यगंधा पांडूरंग म्हात्रे, नुतन सचिन म्हात्रे, महेंद्र विठोबा पाटील, मनाली अतिष पाटील, विनोदिनी जनार्दन कोळी, रविंद्र नामदेव म्हात्रे, लक्ष्मी लक्ष्मण म्हात्रे, जागृती सिध्दार्थ पाटील, अपूर्वा अंकेत म्हात्रे, संजय हिलम, मोहन नागावकर या मात्तबरांनी देखील आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी वडखळच्या राजकारणातील भिष्माचार्य समजले जाणारे प्रभाकर म्हात्रे, प्रकाश म्हात्रे, हरिश्चंद्र शंकर पाटील, हरीभाऊ म्हात्रे, मुरलीधर म्हात्रे, मोरेश्वर काशिनाथ म्हात्रे, नामदेव नारायण म्हात्रे, कृष्णा म्हात्रे हे उपस्थित होते.
जनमताच्या आधारे सहज विजय संपादन करू : निलेश म्हात्रे
दोन दिवसापूर्वी निवडणूक प्रचाराच्यावेळी श्रीफळ वाढविण्याच्या कार्यक्रमाला असंख्य तरुणांनी हजेरी लावून श्री क्षेत्रेश्वर जनमत विकास आघाडी विजय संपादन करेल असे एकंदरीत चित्र स्पष्ट केले आहे. जनमतांच्या आधारे आम्ही विजय संपादन करू. कारण आम्ही मुळातच आघाडी ही फक्त आणि फक्त वडखळ ग्रामपंचायतीच्या विकासाचे धोरण डोळयासमोर ठेऊन केली आहे. वडखळ ग्रामपंचायतीमध्ये निधीची कमतरता नाही, पण विकासात्मक दृष्टीकोन नसल्याने वडखळ ग्रामपंचायतीच्या हद्दिमध्ये येणारी कोळवे, वडखळ, इंद्रनगर, वावे, नवेगाव, या गावांचा विकास जणू काही खुंटलेला आहे, तरी आम्ही या गावांचा विकास कसा होईल याकडे लक्ष देणार आहोत. त्यासाठी जनमत आमच्यासोबत आहे. जनमतांच्या आधारावर सहज विजय संपादन करणार असे मत कृषिवलशी बोलताना श्री क्षेत्रेश्वर जनमत विकास आघाडीचे उमेदवार निलेश म्हात्रे यांनी व्यक्त केले.
