अमर रहेच्या जयघोषात,साश्रुनयनांनी माईला अखेरचा निरोप

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
पुणे | प्रतिनिधी |
पाण्यानं डबडबलेलं डोळे, जोडलेले हात अन पार्थिवाच्या पुढं नतमस्तक होत, हजारोंच्या उपस्थितीत,अमर रहेच्या जयघोषात, ज्येष्ठ समाजसेविका,अनाथांची माय सिंधूताई सपकाळ यांना शासकीय इतमामात मानवंदना देत अखेरचा निरोप देण्यात आला.
पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सिंधूताई सकपाळ यांच्यावर नवी पेठेतील ठोसरपागा येथील स्मशानभूमीत महानुभव पंथाच्या प्रथेप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. यावेळी महापौर मुरलीधर मोहळ , काँग्रेसचे नेते विश्‍वजित कदम यांच्यासह अनेक नेते, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकानी सिंधूताई सकपाळ यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
मंगळवारी रात्री त्यांचे निधन झाले. बुधवारी त्यांचे पार्थिव मांजरी येथील सन्मती बाल निकेतन या आश्रमात दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. माईंच्या अंत्यदर्शनासाठी आश्रमासमोर मोठ्या प्रमाणात अंत्यदर्शनासाठी गर्दी झाली होती.. सिंधुताईंच्या जाण्याने समाजिका जीवनात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना सर्वच स्तरातून व्यक्त केलं जात आहे.

समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांच्या निधनामुळे एक सेवाव्रती, समर्पित व्यक्तीमत्व काळाने आपल्यातून हिरावून घेतले आहे. त्यांनी अनाथ मुलांसाठी सुरु केलेले कार्य निश्‍चितच समाजासाठी,देशासाठी प्रेरणादायी होते.अनेक हालअपेष्टा सहन करीत त्यांनी जे कार्य केले त्याबद्दल देशवासिय त्यांचे ऋणीच आहेत. सिंधुताईंनी सुरु केलेले हे कार्य यापुढेही सुरुच ठेवणे आवश्यक आहे.तीच त्यांनी खरी आदरांजली ठरू शकेल.ताईंच्या निधनाने मला व्यक्तिशा वेदना झालेल्या आहेत.त्यांच्या आत्म्यास शांती लाभो,ओम शांती.
नरेंद्र मोदी,पंतप्रधान

सिंधुताईंच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. आईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच होती. त्यांच्या अचानक जाण्यानं समाजसेवेतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताईंना भावपूर्ण श्रद्धांजली.
उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

Exit mobile version