आधार प्रमाणीकरणासाठी अंतिम आवाहन

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
महाराष्ट्र राज्यशासनाच्या सहकार, विपण्णन तथा वस्त्रोद्योग विभागामार्फत म.ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 ची अंमलबजावणी राज्यभरात करण्यात येत आहेे. हे काम अंतीम टप्प्यात आले असून आगामी काळात ते पूर्णत्वास जाणे, अनिवार्य आहे.

यासाठी 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत प्रलंबित आधार प्रमाणीकरणासाठी तसेच प्रलंबित तक्रारींच्या निवारणासाठी शासनामार्फत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळविण्यासाठी आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक असून विशेष मोहिम ही आधार प्रमाणीकरणाची अंतीम संधी आहे. आधार प्रमाणीकरण न झाल्यास योजनेअंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळू शकणार नाही.

या योजनेतील आधार प्रमाणीकरण प्रलंबित असलेल्या शेतकर्‍यांची यादी बँक तथा विकास संस्था, गामपंचायत कार्यालय आदी ठिकाणी प्रसिध्द करण्या आली असून जिल्ह्यातील पात्र शेतकर्‍यांनी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नजीकचे शाखेत किंवा महा ई – सेवा केंद्राशी संपर्क साधून आधार प्रमाणीकरण करून घ्यावे असे आवाहन बँकेचे कार्यकारी संचालक व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, रत्नागिरी यांनी केले आहे.

Exit mobile version