हरतालिका मूर्तींना अंतिम रूप

| खांदेश्वर | प्रतिनिधी |

गणेशोत्सवाला दि.14 सप्टेंबरपासून सुरुवात होत असून, याच दिवशी हरतालिका पूजनही होणार आहे. यावेळी हरतालिकेच्या निमित्ताने महिला वर्गाकडून उपवास व पूजन केले जाते. त्यामुळे पनवेलच्या कुंभारवाड्यात हरतालिका मूर्ती तयार करण्याच्या कामाला वेग आला आहे. येथील मूर्तिकारांकडून विविध आकारांच्या आकर्षक हरतालिका मूर्तींना रंगरंगोटी व सजावटीचे अंतिम रूप देण्यात येत आहे. पारंपरिक पद्धतीने तयार करण्यात येणाऱ्या या मूर्ती खरेदीसाठी महिला वर्गाची लगबग सुरू झाली आहे. गणेशोत्सवाच्या तयारीसोबतच हरतालिका पूजनाची तयारीही घराघरांत सुरू असल्याचे चित्र पनवेलमध्ये पाहायला मिळत आहे.

Exit mobile version