| पेण | वार्ताहर |
राज्यासह जिल्हयात तथा तालुक्यात सर्वत्र सर्व्हर डाऊन असल्याने ऑनलाईन अर्ज भरण्यास अडथळा येत होता. त्यामुळे गेले दोन दिवस पेणमध्ये एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता. आता काही प्रमाणात सर्व्हर सुरु झाल्याने उमेदवारी अर्ज भरण्यातील अडथळा दूर झाला आहे.
गुरुवारी पेण तालुक्यात 11 ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदासाठी एकूण 18 अर्ज दाखल झाले, तर सदस्यपदासाठी 81 अर्ज दाखल झाले. त्यामध्ये बोरगाव (सरपंचपदासाठी 0/ सदस्यपादासठी 1), बेलवडे बुद्रुक (2/1), वरवणे( 0/0), वडखळ (1/16), वाशी (2/1), दिव (2/11), तरणखोप (3/3), बळवली (3/6), दुष्मी (3/38), बोरी (0/2), महालमिरा डोंगर (2/2), आदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे, अशी माहिती पेण तहसलिदार कार्यालयाने दिली.







