अखेर माणगावात अग्निशमन वाहन दाखल

माणगावकरांची प्रतीक्षा संपली, नागरिकांत जल्लोष
| माणगाव | प्रतिनिधी |
गेले अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असणारे अग्निशमन वाहन अखेर माणगावात आले असून, नागरिकांत जल्लोष होत आहे. त्याचा लोकार्पण सोहळा कार्यक्रम नगरपंचायत लवकर घेणार असल्याची माहिती मुख्याधिकारी संतोष माळी यांनी सांगितले. त्यामुळे या कार्यक्रमाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

रायगड जिल्ह्यात पहिलेच सर्व सोयीनियुक्त अत्याधुनिक सुसज्य अग्निशमन वाहन माणगाव नगरपंचायतीला दोन वर्षांपूर्वी मंजूर झाले होते. सुमारे 3 कोटी 17 लाख 81 हजार रुपये शासनाला खर्च आला आहे. शासनाच्या जिल्हा नियोजनमधून शीघ्र प्रतिसाद क्यूआरव्ही वाहन तथा अग्निशमन वाहन बीएस-6 आवश्यक यंत्रसामुग्री साहित्य खरेदी करण्यासाठी 3 कोटी 17 लाख 81 हजार रुपये मंजूर करण्यात आले होते. तब्बल दोन वर्षे झाल्यानंतर हे वाहन माणगाव नगरपंचायतीत दि. 13 ऑक्टोबर रोजी सुपूर्द करण्यात आले आहे. नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, उपनगराध्यक्ष सचिन बोंबले व त्याचे सर्व सहकारी नगरसेवक यांनी अग्निशमन वाहन लवकर उपलब्ध व्हावे यासाठी संबंधित ठेकेदार व शासनाकडे पाठपुरावा करीत ते उपलब्ध केले.

Exit mobile version