| पेण | प्रतिनिधी |
पेण तालक्यातील हटवणेवाडी येथील किशोरी किरण महालकर ही चार वर्षाची चिमुरडी 12 नोव्हेंबर रोजी गावाच्या बाहेरून बेपत्ता झाली होती. गेली तीन दिवस हिला शोधण्यासाठी पोलीस यंत्रण व गुरुनाथ साठीलकर यांचे हेल्प फाऊंडेशन अथक प्रयत्न करत होते. दोन दिवसात जवळपास तीन डोंगर शोधून काढले. मात्र, किशोरीचा काही पत्ता लागत नव्हता. स्वतः पोलीस अधीक्षक आंचल दलाल यादेखील या शोध मोहिमेमध्ये सामील झाल्या होत्या. अखेर शुक्रवारी सकाळी शोधमोहीम सुरु असतानाच तिसऱ्या डोंगराच्या वरच्या बाजूला ही चिमुरडी पोलिसांना आढळून आली. उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे व पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल आणि त्यांच्या टीमला अखेर यश आले. जवळपास दोनशे लोक गेली तीन दिवस किशोरीला शोधत होते. तिच्यावर प्राथमिक उपचार उपजिल्हा रुग्णालय पेण येथे करण्यात आले आहेत. पुढील तपास पेण पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या नेतृत्वाखाली करत आहेत.






