अखेर खारकोपर-उरण मार्गावरून रेल्वे धावली

। उरण । प्रतिनिधी ।
मागील 27 वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली उरणमधील खारकोपर लोकल मार्गावरुन शुक्रवारी (दि.10) पहाटे रेल्वे धावली. त्यामुळे काही दिवसात ही सेवा सुरू होण्याची चिन्हे दिसू लागल्याने उरणच्या लोकलची घटिका समीप आल्याने उरणकारांनी आनंद व्यक्त केला आहे. अनेक वर्षांपासून उरणकरांना लोकल ट्रेनची प्रतिक्षा आहे. मुंबई, नवी मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असतांनाही उरणमधील नागरिकांना व प्रवाशांना विशेषतः नवी मुंबईत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडी, खड्डे, धूळ आदी समस्यांचा सामना प्रवास करावा लागत होता.

त्यामुळे कमी वेळात आणि आरामदायी प्रवासाची सुविधा मिळावी, अशी आस लागून राहिलेली होती. ती आता प्रत्यक्षात उतरणार आहे. त्यामुळे उरणवासियांमध्ये आनंद आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Exit mobile version