क्रिप्टो विधेयक आणणार- अर्थमंत्री

The Union Minister for Finance and Corporate Affairs, Smt. Nirmala Sitharaman addressing a Press Conference, in New Delhi on June 28, 2021.

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
क्रिप्टोकरन्सीच्या जाहिरातींवर बंदी घालण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. तसेच हे एक मजोखमीफ असलेले क्षेत्र असून ते पूर्ण नियामक चौकटीत नाहीये. त्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि बाजार नियामक मार्फत जागरूकता निर्माण करण्यासाठी पावले उचलली जात आहेत, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मंगळवारी राज्यसभेत दिली. याशिवाय सरकार याबाबत लवकरच विधेयक आणणार असल्याचे त्या म्हणाल्या. नवीन विधेयकावर काम केले जात असून ते लवकरच मंत्रिमंडळासमोर मांडले जाईल, असे त्यांनी राज्यसभेत प्रश्‍नोत्तराच्या तासात सांगितले. त्या म्हणाल्या की, गेल्या वेळी क्रिप्टोकरन्सीवर एक विधेयक प्रस्तावित करण्यात आले होते, परंतु आता आम्ही नवीन विधेयकावर काम सुरू केले असून मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यावर ते सभागृहात सादर केले जाईल असे त्या म्हणाल्या.

Exit mobile version