। उरण । वार्ताहर ।
उरण तालुका द्रोणागिरी माऊली रिक्षा चालक-मालक संघटनेच्यावतीने मृत्यू नंतर प्रत्येक रिक्षा चालकास आर्थिक सहाय्य दिले जाते. गेली 25 वर्षांपासून हा उपक्रम सुरु आहे. नुकतेच उरण शहरातील पालवी हॉस्पिटलजवळ असलेल्या रिक्षा चालक-मालक संघटनेच्यावतीने संघटनेचे सदस्य सुनील नामदेव पाटील यांचे निधन झाले. त्यांच्या परिवारास (मृत्यू फंड) आर्थिक सहाय्य 10 हजार रुपये देण्यात आले.
यावेळी किशोर पाटील, अजय धोत्रे, श्याम घरत, जयराज म्हात्रे, रमेश ठाकूर, दिपक म्हात्रे, महेंद्र घरत, के .के. म्हात्रे, गंगाधर पाटील, पांडुरंग भोईर, विलास म्हात्रे, कैलास म्हात्रे, मयूर ठाकूर, नरेंद्र म्हात्रे, भरत म्हात्रे, तुलसीदास पाटील आदि सदस्य होते.