पशुधनासाठी शेतकर्‍यांना मिळणार अर्थसहाय्य

पशुपालन आणि शेतकर्‍यांनी अर्ज करावे- डॉ रोहिणी गायकवाड

| खोपोली | प्रतिनिधी |

पशुसंवर्धन विभागाच्या राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय नाविन्यपूर्ण योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. या नाविन्यपूर्ण योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले असून खालापूर तालुक्यातील बहुसंख्य शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा, असे आवाहन पशुधन विकास अधिकारी खालापूर डॉ. रोहिणी गायकवाड यांनी केले आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 13 डिसेंबर ते 11 जानेवारी पर्यंत कालावधी असून अर्ज MAHABMS या गुगल प्ले स्टोवरील मोबाईल अप्स अर्ज स्वीकारण्यात येतील. यात प्रामुख्याने सुसूक्षित बेरोजगार युवकांसह पशुपालन शेतकरी बांधवांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य उपलब्ध होणार आहे त्यांना शाश्‍वत अर्थसहाय्यचा पर्यंत उपलब्ध करून देणार्‍या पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रमाद्वारे ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान करण्यासाठी विविध वयक्तिक लाभाच्या योजना शासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत.

शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वयक्तिक लाभाच्या योजना अंतर्गत प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनामध्ये गेली चार वर्षे ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविणे आणि त्यातून लाभार्थीची निवड करन्याची पद्धत सुरू करण्यात आली आहे दरम्यान जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी ही संगणक प्रणाली लागू करण्यात आली आहे. या मध्ये शासनाच्या योजनाकरिता अर्ज केल्यानंतर त्या लाभार्थ्यांला दरवर्षी पुन्हा अर्ज करावा लागू नये यासाठी तयार करण्यात आलेली प्रतीक्षा यादी सन 2021- 22 पासून पुढील पाच वर्षांपर्यंत म्हणजे 2025 – 26पर्यंत लागू ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, यामुळे अर्ज केलेल्या लाभार्थीला लाभ मिळण्याची शक्यता वाढली असून त्यांच्या प्रत्यक्ष यादीतील क्रमाक्रनुसार अंदाजे केव्हा लाभ मिळेल हे समजू शकल्यामुळे लाभार्थी हिस्सा भरणे, किंवा बाबीकरिता नियोजन करता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत दुधाळ गाई म्हशीचे गट वाटप करणे, 1000 मांसल कुकुट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणे, आदी योजनांच्या लाभासाठी पशुपालकाना पशुधनासाठी अर्थसहाय्य करण्यात येणार आहे.

यासाठी खालापूर तालुक्यातील बहूसंख्य पशुपालक आणि शेतकरी यांनी अर्ज करावे असे आवाहन पशुधन विकास अधिकारी खालापूर डॉ. रोहिणी गायकवाड यांनी केले आहे.

Exit mobile version