श्रवण भगत याला आर्थिक मदत

आदिवासी सेवा संघाचा स्त्युत्य उपक्रम
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील भक्ताचीवाडी येथील 13 वर्षीय श्रवण विलास भगत या तरुणाला मैदानात खेळताना गंभीर जखम झाली होती. वडिलांचे छत्र यापूर्वी हरवले असल्याने व आई मोलमजुरी करीत असल्याने उपचार करू शकत नव्हती. दरम्यान, आदिवासी सेवा संघाने त्या तरुणाला आर्थिक मदत करीत उपचाराचा भार उचलला आहे.

आदिवासी सेवा संघाचे पदाधिकारी यांनी भक्ताचीवाडी येथे जाऊन श्रवण विलास भगत या खेळताना पडलेल्या तरुणाची भेट घेतली. आदिवासी सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी आर्थिक मदत रोख स्वरूपात श्रवणच्या हाती दिली.त्यावेळी आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष बुधाजी हिंदोळा, भगवान भगत जिल्हा उपाध्यक्ष, जैतु पारधी अध्यक्ष कर्जत तालुका, गणेश पारधी बेकरेवाडी सचिव रायगड जिल्हा, चंद्रकांत पारधी जुमापटी खजिनदार रायगड जिल्हा, बाळु शिवा ठोंबरे उपाध्यक्ष कर्जत तालुका, नामदेव निरगुडे खजिनदार कर्जत तालुका, विलास भला सचिव साहेब कर्जत तालुका, भाऊ मेंगाळ विभागीय अध्यक्ष कळंब विभाग, सुरेश दरवडा विभागीय अध्यक्ष खांडस विभाग, लक्ष्मण दरवडा मोरेवाडी विभागीय अध्यक्ष पाथरज विभाग, संजय केवारी ताडवाडी विभागिय अध्यक्ष बांगारवाडी ताडवाडी विभाग, सुरेश महादु दरवडा जांभळवाडी विभागीय अध्यक्ष मोरेवाडी मार्गाची वाडी, आदी उपस्थित होते.

Exit mobile version