अतुल म्हात्रे यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन केले सांत्वन
| पेण | प्रतिनिधी |
पेण येथील कणे गावात गणेश दिनकर म्हात्रे यांच्या घरावर वीज पडून त्यांच्या घराला आग लागली व त्यांचे प्रचंड नुकसान झाले. याची माहिती मिळाल्यानंतर त्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी व त्यांच्या कुटुंबाला मदतीचा हातभार लावता यावा यासाठी पेण तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे तरुण, उच्च शिक्षित नेतृत्व अतुल म्हात्रे यांनी गणेश दिनकर म्हात्रे यांची व त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबियांना पंचवीस हजारांची मदत देऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी अतुल म्हात्रे यांच्यासोबत शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते भास्कर पाटील, नागाजी पाटील, बळीराम पाटील, अनंत पाटील, रविकांत पाटील, धीरज पाटील, महेंद्र ठाकूर, शेखर शेळके, नरहरी पाटील आदी कार्यकर्ते व कणे व इतर गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी या नुकसानग्रस्त कुटुंबाची भेट देऊन त्यांचे सांत्वन करून पंचवीस हजार रूपयांची मदत दिल्याबद्दल अतुल म्हात्रे यांचे कणे येथील कार्यकर्ते व उपस्थित ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले.