घर विक्री व्यवहारात आर्थिक फसवणूक; इस्टेट एजंटवर गुन्हा दाखल

| रेवदंडा | प्रतिनिधी |

घर विक्री व्यवहारात फसवणूक केल्याचा प्रकार कोर्लई येथे घडला आहे. याबाबत रेवदंडा पोलिस ठाणे येथे याबाबत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार रेवदंडा पोलिसांनी एकावर आर्थिक फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.

कोर्लई ख्रिश्‍चनपाडा येथील मिलर रूबान रूझारिओ यांनी इस्टेट एजंट व्यावसायीक रॉकी तोमास ग्रेशीयस याच्या माध्यमातून सावत्र भाऊ टोनी रूबान रूझारिओ व राजेंद्र रूबान रूझारिओ यांचे मालकीचे कोर्लई ग्रा.प.हद्दीतील घर मिळकत क्रमांक 619/अ/2 व घर मिळकत क्रमांक 619/अ/3 या घर मिळवून देतो, असे सांगून रॉकीने रुझारिया यांच्याकडून विविध वेळा 25 लाखांच्या आसपास पैसे धनादेशाद्वारे घेतले. पैसे दिल्यानंतर घर मिळकतीचा व्यवहार पुर्ण करण्याचा तगादा लावला असता इस्टेट एजंट व्यावसायीक रॉकी तोमास ग्रेशीयस टाळाटाळ करून लागला.

यावेळी रॉकीने हा व्यवहार आता 23 लाख रूपयांत होणार नसून 30 लाख रूपयांत होणार आहे. मात्र व्यवहार 30 लाख रूपये व्यवहार परिस्थिीतीनुसार पूर्ण करू शकत नसल्याने सदर माझी रक्कम मला परत कर, असे वेळोवेळी भेटून सांगितले. तसेच रक्कम परत करण्यासाठी अवधी सुध्दा दिला. परंतू कोणतीही रक्कम परत केली नाही. सदर इस्टेट एजंट व्यावसायीक रॉकी तोमास ग्रेशीयस यांनी विश्‍वास घात करून फसवणूक केली आहे. अशी तक्रार रेवदंडा पोलिस ठाणे येथे मिलर रूबान रूझारिओ यांनी केली आहे. तक्रारी नुसार इस्टेट एंजट रॉकी तोमास ग्रेशीयस याचे विरोधात भादविकलम 406,420 प्रमाणे गुन्हा नोंदविला असून अधिक तपास रेवदंडा पोलिस ठाण्याचे पो.नि. देविदास मुपडे हे करत आहेत.

Exit mobile version