| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
वित्तीय समावेशन ही सर्वांगीण आर्थिक विकासाची किल्ली आहे. देशातील प्रत्येक नागरिकाने बँकिंग प्रणालीशी जोडले जाऊन तिच्या सुविधांचा लाभ घ्यावा. सर्व ग्राहकांनी आपल्या खात्याचे पुनर्जीवन वेळेत करून घ्यावे. सरकारकडून मिळणाऱ्या थेट लाभाचा फायदा करून घ्यावा. डिजिटल व्यवहार करताना आवश्यक सुरक्षा उपायांचे महत्त्व अधोरेखित करत वित्तीय साक्षरतेसाठी अशा शिबिरांचे सातत्याने आयोजन करावे, असे आवाहन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी निर्देशक नीरज निगम यांनी केले.
खालापूर तालुक्यातील खोपोली येथे विशेष वित्तीय समावेशन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. महाराजा मंगल कार्यालयात शुक्रवारी (दि.12) हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी निर्देशक नीरज निगम व प्रादेशिक निर्देशक (मुंबई) सुमन रे आदी अधिकाऱ्यांकडून मोलाचे मार्गदर्शन शिबीराच्या माध्यमातून देण्यात आले. या शिबिरात बँक ऑफ महाराष्ट्रचे मुख्य महाप्रबंधक दिनकर संकपाळ, बँक ऑफ इंडियाचे मुख्य महाप्रबंधक सुनील शर्मा, युनियन बँक ऑफ इंडियाचे महाप्रबंधक दिलीप मिश्रा, बँक ऑफ बडोदाचे महाप्रबंधक सुनील कुमार शर्मा, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे रिजनल मॅनेजर विभोर अग्रवाल, बँक ऑफ इंडियाच्या रायगड विभाग प्रमुख दीपन्विता सहानी, स्टेट बँक ऑफ इंडियाचे उप महाप्रबंधक दया शंकर अशा अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. या शिबीरामध्ये सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला बचतगट, लघुउद्योग प्रतिनिधी आदींना खाते उघडणी, पुन्हा-केवायसी प्रक्रिया, पीएम जनधन योजना, सामाजिक सुरक्षा विमा योजना, मुद्रा कर्ज योजना, डिजिटल व्यवहारा, डिजिटल फ्रॉड विषयी मार्गदर्शन तसेच विविध बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.
वित्तीय समावेशन आर्थिक विकासाची किल्ली: नीरज निगम
