बोर्लीपंचतन येथे आर्थिक साक्षरता अभियान

| बोर्लीपंचतन । वार्ताहर ।

बोर्लीपंचतन येथील रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राष्ट्रीय कृषी ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) यांच्या विद्यमाने सोमवार (दि.23) बोर्ली पंचतन येथील आरडीसीसी बँकेच्या शाखेमधील स्वयंसहाय्यता बचत गटाच्या खातेदार महिलांसाठी आर्थिक आणि डिजिटल साक्षरता अभियान व हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले. नाबार्डच्या विविध योजना त्याचबरोबर महिलांना बँकेच्या आर्थिक व डिजीटल व्यहराबद्दलच्या मार्गदर्शनातून महिला बचत गटांनी आपला विकास साधावा या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

श्रीवर्धन आरडीसीसी बँकेच्या शाखाधिकारी विद्या खडतर, बोर्लीपंचतन शाखाधिकारी प्रकाश खेऊर, सह्याद्री महिला ग्रामसंघांच्या अध्यक्ष मानसी जाधव, प्रथमेश महिला बचत गटाच्या सदस्या अभिरुची मुकादम यांनी महिलांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. तर बँकेच्या आर्थिक व डिजीटल व्यवहाराबद्दल रोहन कडमकर यांनी महिलांना माहीती दिली. याप्रसंगी बँकेचे कर्मचारी पुष्पा शिंदे, आशिष पडगे, निखिल रोटकर, सुजित केणे, आश्‍विनी नागे, रितु तोंडलेकर व महिला बचत गटाच्या सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. बँकेच्या या उपक्रमाला उपस्थित राहून केलेले मार्गदर्शन व पंचक्रोशीतील बचत गटाच्या सहभागी महिलांचे शाखाधिकारी प्रकाश खेऊर यांनी आभार मानले.

Exit mobile version