मुलींना 50 सायकल वाटप, तर शाळेला पाच लाखांची मदत
| खोपोली | प्रतिनिधी |
आर्थिक साक्षरता आणि डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी जागरूकता शिबिराचे स्टेट बँक ऑफ इंडिया क्षेत्रीय व्यवसाय कार्यालय पनवेल यांच्यावतीने खोपोलीत समर्थ मंगल कार्यालयात गुरूवारी, (दि.14) आयोजन करण्यात आले होते. बँकेचे चेअरमन सी.एस.शेट्टी यांच्या उपस्थितीत मुद्रा कर्ज वाटप, सीएसआर फंडातून शांतीनगरमधील मराठी शाळेला पाच लाखांची मदत तसेच चिलठण हायस्कूलमधील विद्यार्थिनींना सायकलचे वाटप करण्यात आले. तसेच आपल्या बँक खात्यासंबंधी गोपनीय माहिती कोणाला देऊ नका कोणतेही माहिती हवी असल्यास जवळच्या बँक शाखेत संपर्क साधा, असे अवाहन चेअरमन सी.एस. शेट्टी यांनी केले.
स्टेट बँक आँफ इंडिया क्षेत्रीय व्यावसाय कार्यालय पनवेल यांनी कार्यक्रमाचे आयोजन खोपोली शहरात केले होते. या कार्यक्रमासाठी स्टेट बँक आँफ इंडियाचे चेअरमन सी.एस.शेट्टी, चीफ जनरल मँनेजर मुंबई मेट्रो मंजू शर्मा, डीएमडी अरविंद सिंग प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी एसबीआय डीजीएम पूर्व मुंबई नवीन मिश्रा, एसबीआय प्रादेशिक व्यवस्थापक पनवेल सूर्यजीत सिंग, मुख्य व्यवस्थापक एसबीआय खोपोली शाखा मुकेश कुमार, खालापूर पंचायत समितीचे मा.सदस्य, ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य,महिला बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जीवन गती विमा वाटप, मुद्रा कर्ज वाटप, सीएसआर फंडातून शांतीनगरमधील मराठी शाळेला पाच लाखांची मदत तसेच चिलठण हायस्कूलमधील विद्यार्थिनींना सायकलचे वाटप करण्यात आले. आदर्श महिला बचत गट, दत्तकृपा विघ्नहर्ता महिला बचत गट, शिवसमर्थ, पंचशील गावदेवी तसेच मावळ तालुक्यातील आदर्श सरपंच लक्ष्मण ढाकू पारखे कान्हे ग्रामपंचायत गणेश तुकाराम भानुसारे सरपंच यांचाही सन्मान करण्यात आला.






