आरबीआयतर्फे अलिबागेत आर्थिक साक्षरता कार्यक्रम

। अलिबाग । वार्ताहर ।
वित्तीय समावेशन आणि विकास विभाग, रिझर्व बँक ऑफ इंडिया, मुंबई प्रादेशिक कार्यालय यांच्या वतीने आणि बँक ऑफ़ इंडिया यांच्या सहकार्याने हॉटेल होरिजन, खडताळ ब्रिज, अलिबाग – रेवस रोड, वरसोली, अलिबाग, रायगड येथे सोमवारी (6 जून ) सकाळी 10.30 वाजता आर्थिक साक्षरता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा उद्देश समाजातील इतर घटकांना बचतीचे महत्त्व, व्यवसायाची उभारणी, बँकामार्फत व्यवसायासाठी लागणारे आर्थिक सहाय्य, मालासाठी तयार करावयाची घरगुती व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, निर्यातीसाठी आवश्यक मार्गदर्शन व उपलब्ध असलेल्या सरकारी योजना इत्यादी बाबींवर सविस्तर चर्चा आणि मान्यवर व्यक्तींकडून मार्गदर्शन झाले.
प्रादेशिक संचालक महाराष्ट्र, भारतीय रिजर्व बँक, मुंबई अजय मिचयारी, महाव्यवस्थापक, भारतीय रिज़र्व बँक, मुंबई प्रादेशिक कार्यालय, कल्पना मोरे, महाव्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया सुब्रतो कुमार रॉय, शंपा बिस्वास, क्षेत्रीय प्रबंधक, बैंक ऑफ इंडिया, समरेश शाहा , कावेरी पवार आणि स्नेहल विचारे, एमएसआरएलएम, डीडीएम नाबार्ड तसेच भारतीय रिज़र्व बँकचे अधिकारी अशा मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर बँकेकडून वेळोवेळी आरबीआय कहता है या जनजागृती उपक्रमांतर्गत घेण्यात येणार्‍या सामाजिक सुरक्षा, सुरक्षित बॅकिंग व्यवहार, डिजिटल बॅकिंग ला प्राधान्य, स्वच्छ चलन धोरण तसेच चलनाचा मान कसा राखावा याचे मार्गदर्शन बँकिंग लोकपालांची कार्यप्रणाली, बँक खातेधारकाचे अधिकार इत्यादी बाबींवर सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.

Exit mobile version