सहकार कायदयातील बदलांमुळे पतसंस्थाना आर्थिक स्थैर्य

| मुरूड | प्रतिनिधी |

प्रगतीशिल महाराष्ट्र राज्यात सहकारी संस्थांचे जाळे पसरले आहे सहकार क्षेत्र निकोप राखण्या साठी सहकार आयुक्त कार्यालयाने नियामक मंडळ बसविले आहे. सहकार कायद्यातील तरतुदींचे योग्य पालन केल्यास पतसंस्थांना आर्थिक स्थैर्य लाभून सहकार चळवळ पुढे नेता येईल असे प्रतिपादन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रायगड येथील अधिकारी प्रा.एस.बी. वाटाणे यांनी केले.

मुरुड तालुका नागरी पतसंस्थेतील संचालकांसह कर्मचारी वर्गासाठी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी महात्मा फुले पतसंस्थेचे चेअरमन अजित गुरव उपाध्यक्षा अनिता चौलकर प्रा.एस.बी. वाटाणे सहकार भारतीचे जिल्हा मंत्री प्रा मेघराज जाधव संजय ठाकूर आदेश दांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविकात महात्मा फुले पतसंस्थेचे अध्यक्ष अजित गुरव यांनी प्रशिक्षणाद्वारे वेळोवेळी होणारे सहकार क्षेत्रातील बदल ज्ञात होत असुन दैनंदिन कामकाजात प्रशिक्षणाचा लाभ होत असल्याचे सांगितले.

प्रशिक्षण कार्यक्रमात महात्मा फुले पतसंस्था, जय श्रीराम पतसंस्था, श्री काळभैरव पतसंस्था, वाल्मिकी पतसंस्था मजगाव, प्रभात पतसंस्था ताडवाडी, परस्पर सहकारी पतसंस्था, कोर्लई ग्रामीण पतसंस्था, मुरुड तालुका माध्यमिक सेवकांची पतसंस्था, मर्चट क्रेडीट पतसंस्था आदींचा समावेश होता. प्रा. जाधव, संजय ठाकूर यांनी ही मनोगत व्यक्त केले.

प्रा. वाटाणे यांनी पतसंस्था आयकर कायदे, कर्जवितरण, कजेवसूली, ऑडिट, संचालक मंडळ अधिकार, कर्तव्य व जबाबदाऱ्या आदी विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच प्रशिक्षणार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली. प्रशिक्षणार्थीना प्रशस्तीपत्रे ही प्रदान करण्यात आली. शेवटी अनिता चौलकर यांनी आभार व्यक्त केले.

Exit mobile version