| श्रीवर्धन | वार्ताहर |
कोणत्याही क्षेत्रात करिअर करावयाचे असेल, तर संधी, सुरक्षितता, वाढ आणि सातत्य याचा विचार करायला हवा. विद्यार्थ्यांनी आपले करिअर घडविण्यासाठी विविध वाटा शोधाव्यात, असे प्रतिपादन पुणे येथील सी.ए. प्रा. राजेंद्र डांगे यांनी केले. श्रीवर्धन येथील गोखले महाविद्यालयात वाणिज्य विभागांतर्गत वाणिज्य विद्या शाखेतील विद्यार्थ्यांना ‘करिअरच्या संधी’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
प्राचार्य डॉ. श्रीनिवास जोशी यांनी वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या व व्यवसायाच्या संधीबाबत माहिती दिली. प्रास्ताविक व परिचय वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.कल्याणी नाझरे यांनी करुन दिला. व्यवसायात झालेल्या नफ्याची गुंतवणूक कशी व केव्हा करावी, याचा जास्तीत जास्त परतावा कसा मिळू शकेल व टॅक्स कसा वाचवता येईल, याबाबत अभ्यासपूर्ण विचार श्री. डांगे यांनी मांडले. अंधारात चाचपडणाऱ्या आमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांस दिशादिग्दर्शनाचे काम या व्याख्यानातून झाले, अशी भावना डॉ. कल्याणी नाझरे यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अमोल खेराडे यांनी केल्यावर कार्यक्रमाचा समारोप झाला.





