सिडकोविरोधात भूमिपुत्रांनी थोपटले दंड

बेकायदेशीर भूसंपादनाविरोधात जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार
प्रकल्पग्रस्तांचे नेते राजाराम पाटील यांचा पुढाकार

 पाली/बेणसे | प्रतिनिधी |

बालई कलधोडा या विभगातील जमिनींचे भूसंपादन हे बेकायदेशीर असून, सिडकोच्या या भूसंपादनाच्या विरोधात स्थानिक भूमिपुत्रांनी दंड थोपटले आहेत. बालई काळाधोंडा ग्रामविकास परिषदेच्या वतीने प्रकल्पग्रस्तांचे नेते राजाराम पाटील यांनी रायगड उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा भूसंपादन अधिकारी, तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे सिडकोविरुद्ध तक्रार केली आहे.
सिडको 1973 च्या कालबाह्य शासन राजपत्रातील नोटिफिकेशनद्वारे उरणच्या जमिनीचे भूसंपादन करीत आहे. ही शेतकर्‍यांची थेट फसवणूक आहे. उरण येथील जमिनीवर नैसर्गिक लोकसंख्येनुसार वाढलेली विस्तारीत गावठाणात हजारो घरे आहेत. 1950 पासून नेव्ही ऑयेनजीसी जेएनपीटी एमएसीबी सिडको, सेझ यांचे भूसंपादन झाले आहे. आता जमीन शिल्लक नाही. सर्व जमिनीवर मूळ उरणकर आगरी, कोळी, कराडी, माळी, चर्मकार, बौद्ध, मातंग, आदिवासी, बारा बलुतेदार अल्पसंख्याक मुस्लिम ईस्ट इंडियन ख्रिश्‍चन आणि इतर भारतातून आलेल्या केंद्रीय कर्मचारी वर्गाची स्वतंत्र बंगले आणि टुमदार घरे आहेत.सिडकोने अगोदर घरांसाठी घेतलेल्या मौल्यवान जागा रिलायन्स अंबानी सेझ प्रकल्पासाठी विकल्याने सिडको जमिनीसाठी दिवाळखोर झाली आहे. 1970 सिडको आणि 2013 साठी नवी मुंबई अदानी विमानतळ या खासगी प्रकल्पासाठी घेतलेल्या जमिनींचे पुनर्वसन करण्यासाठी सिडकोकडे जमीन शिल्लक नाही. आज सुरू आहे ती फसवणूक, म्हणूनच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे आम्ही तक्रार केली आहे. 1894 चा कायदा रद्द होऊन भूसंपादन कायदा 2013 केंद्र सरकारने आणला. याबाबत स्थानिक आमदार, खासदार, प्रशासन, राज्य सरकार शेतकर्‍यांना प्रबोधित का करीत नाही? सारे शेतकर्‍यांची लुबाडणूक का करीत आहेत. या कायद्यानुसार जमीन संपादन प्रक्रिया सुरू करण्याअगोदर येथे प्रकल्प बाधित लोकांचा सामाजिक आघात परिणाम सर्व्हे जिल्हाधिकारी रायगड यांनी करणे कायद्याने बंधनकारक आहे. यामुळे अनेक टपरी, कोंबडी चिकन सेंटर, दुकाने यांचे शेतकरी, मच्छिमार व्यावसायिक पुनर्वसन होऊ शकते.हे डावलून साडे बावीस टक्के सहमती पत्राने घोर फसवणूक झाली आहे. येथील बौद्ध लेणी,पिरवाडी दर्गा,जुने चर्च,पुरातन हिंदू मंदिरे वाचविण्यासाठी सिडको हटाव उरण बचाव हे ब्रीदवाक्य घेऊन लोकनेते दि.बा. पाटील, नारायण नागू पाटील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि उरणच्या समुद्रातील छत्रपती शिवरायांच्या आरमारी इतिहासातील मावळे आगरी कोळी भंडारी कराडी इर्षेने या लढ्यात उतरले आहेत, अशी माहिती राजाराम पाटील यांनी दिली.

Exit mobile version