| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
तिसाव्या ़िफनेस्टा ओपन नॅशनल टेनिस चॅम्पियनशिपची सुरुवात 29 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथील डीएलटीए कॉम्पलेक्समध्ये होत आहे. डीसीएम श्रीराम लिमिटेडचा मदतीने, ही स्पर्धा ऑल इंडिया टेनिस असोसियेशन आणि दिल्ली लॉन टेनिस असोसियेशनद्वारे आयोजित केली जाते. ़िफनेस्टा ओपन ही भारतातील सर्वात मोठी स्थानिक टेनिस स्पर्धा असून, यामध्ये देशभरातून विविध खेळाडू सहभागी होतात. एकमेव व्यापक अशी राष्ट्रीय स्पर्धा म्हणून आयोजित केल्या जाणाऱ्या या चॅम्पियनशिपमध्ये पुरूष, महिला आणि अंडर-18/अंडर-16/अंडर-14 (मुलं आणि मुली) अशा श्रेणींमध्ये टूर्नामेंट आयोजित केल्या जातात. या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत रोहन बोपण्णा, सोमदेव देववर्मा, युकी भाम्ब्री, सानिया मिर्झा आणि ऋतुजा भोसले यांसारख्या अग्रगण्य स्पर्धकांनी देखील सहभाग घेतला आहे. स्पर्धेचे नियोजन क्वॉल़िफायिंग राऊन्ड पुरूष, महिला आणि अंडर-18 सुरवात: 27 सप्टेंबर 2025पुरूष, महिला आणि अंडर- 18 (एकेरी आणि दुहेरी) प्रमुख स्पर्धा: 29 सप्टेंबर – 4ऑक्टोबर 2025अंडर – 16 आणि अंडर – 14 (मुलं आणि मुली) : 5-10 ऑक्टोबर 2025.







