नेरळ | वार्ताहर |
मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील कर्जत एन्डकडील भिवपुरी रोड रेल्वे स्थानकात सायंकाळी अचानक आग लागली. येथील पादचारी पुलावर शॉटसर्किटमुळे लागलेल्या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मेन लाईनवरील भिवपुरी रोड रेल्वे स्थानकात मुंबई एन्डकडील पादचारी पुलावर सायंकाळी सात वाजता आग लागली. फारसा वापर नसलेल्या या पादचारी पुलावर सायंकाळी लागलेली आग ही शॉटसर्किटमुळे लागली असल्याचे भिवपुरी रोड रेल्वे स्थानक प्रबंधक वर्मा यांनी सांगितले. तर, आग लागल्याची माहिती मिळताच भिवपुरी रोड रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकार्यांनी आग विझविण्याचे साहित्य तेथे आणून आग विझविण्यात आली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती प्रवासी संघटनेचे अध्यक्ष किशोर गायकवाड यांनी दिली.
भिवपुरी रोड रेल्वे स्थानकात आग
