| महाड | प्रतिनिधी ।
महाड शहरातील चवदार तळे परिसरात महालक्ष्मी बेकरी तसेच दुग्धजन्य वस्तू विक्री करणाऱ्या एका दुकानाला आग लागली. ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. यात दुकानातील सर्व साहित्य जळून नुकसान झाले. महाड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून पुढील तपास महाड शहर पोलीस करीत आहेत.







