टाकीगांवच्या माळरानाला आग

| चिरनेर । वार्ताहर ।
उरण तालुक्यात वणवे लागायला आतापासूनच सुरुवात झाली असून, शुक्रवार (2) टाकीगांव हद्दीतील बस स्टॉप जवळच्या माळरानाला आग लागल्याने या वनव्यात वनसंपदा व सजीवसृष्टी ही आगीच्या भक्ष्यस्थानी आली आहे. दरम्यान सायंकाळी आग लागल्याचे वृत्त समजताच, चिरनेरच्या फ्रेंड्स ऑफ नेचरचे जयवंत ठाकूर, त्यांचे सहकारी यश, युवराज शर्मा, हिम्मत केणी, दिनेश चिरनेरकर, शेखर म्हात्रे या सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली, आणि आग पूर्णपणे आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. ही आग पूर्णपणे विझविण्यात या टीमला यश आले. या आगीचे रूपांतर प्रचंड वणव्यात झाल्याने, परिणामी आगीत झाडे झुडपे व पशु पक्षांची घरटी, अंडी आणि त्यांची लहान पिल्ले तसेच सूक्ष्मजीव जळून खाक झाली.

Exit mobile version