लाखो रुपयांचे नुकसान
। रसायनी । प्रतिनिधी ।
जुना मुंबई-पुणे रस्त्यावर चौक हद्दीत प्लास्टिक वस्तू बनविणाऱ्या कारखान्याला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मुंबई-पुणे रस्त्यावर चौक येथे प्लास्टिक खेळणी, प्लास्टिक वस्तू, आणि फायबर वस्तू बनविणारा कारखाना आहे. कारखाना शेजारी मोठा प्रमाणात कचरा होता, त्याला लावलेली आग ही या आगीला कारणीभूत असल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
कारखान्यात असणाऱ्या केमिकलने पेट घेतल्याने परिसरात उग्र वासाचा त्रास जाणवत असून धुराचे लोट दूरपर्यंत उंच पसरले. आग लागल्याची माहिती मिळताच औद्योगिक विकास महामंडळाचे दोन अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून त्यापूर्वी ग्रामस्थांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. सुमारे दोन तासांनी आगीवर नियंत्र मिळवण्यात यश आले. चौक पोलीस आबा गेन, एकनाथ गर्जे, दिनेश भोईर, बबन घुले, गणेश पाटील, शरद फरांदे या पोलिसांनीदेखील मोठी मदत केली.
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सचिन पवार व चौक प्रभारी विशाल पवार हे दाखल होत कारखान्यातील साहित्य, केमिकलचे डबे, तयार झालेला माल बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. हा कारखाना मुंबई-पुणे रस्त्यावर असल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
