श्रीवर्धन पालिकेच्या डम्पिंग ग्राऊंडला आग

श्रीवर्धन | वार्ताहर |
श्रीवर्धन नगरपरिषदेच्या डम्पिंग ग्राऊंडला रविवारी रात्री मोठ्या प्रमाणात आग लागली या आगीमध्ये फक्त प्लास्टिकचे गठ्ठे तीन ठिकाणी ठेवलेले होते त्या ठिकाणी जळून खाक झाली आहेत.
डंपिंग ग्राउंडच्या ठेकेदाराला ज्या ठिकाणी भंगारा पासून उत्पन्न मिळते ते सर्व जागच्या जागी आहे. त्याला कोणत्याही प्रकारची आग लागलेली नाही. आग लागल्याची बातमी श्रीवर्धन मधील सामाजिक कार्यकर्त्या प्रभावती उपाध्ये या बाजूलाच राहत असल्याने त्यांना सर्वप्रथम कळली. त्यानंतर प्रभावती उपाध्ये यांनी श्रीवर्धनमध्ये येऊन त्या ठिकाणी आग लागल्याची बातमी आजूबाजूच्या शेतकर्‍यांना कळवली. त्यानंतर डम्पिंग ग्राउंड च्या बाजूला असलेल्या शेतकर्‍यांनी याबाबत खात्री करून घेतल्यानंतर श्रीवर्धन पोलीस ठाण्यात कळविण्यात आले. श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी त्या ठिकाणी दाखल झाले.
प्रांताधिकारी अमित शेडगे,मुख्याधिकारी विराज लबडे त्याठिकाणी दाखल झाले. त्यानंतर श्रीवर्धन नगरपरिषदेच्या फायरफायटर गाड्या त्याठिकाणी दाखल झाल्या फायरफायटर आल्यानंतर आग नियंत्रणात आली.
परंतु त्या ठिकाणी असलेल्या शेड मधील सर्व लोखंडी चॅनेल वाकडेतिकडे झाल्याचे निदर्शनास आले. मात्र आग ही कोणी लावली याबाबत अद्यापही कोणती माहिती प्राप्त झालेली नाही.

Exit mobile version