इमारतीतील खानावळीला आग

। पनवेल । वार्ताहर ।

कळंबोली वसाहतीमधील सेक्टर 1 परिसरात असलेल्या एका इमारतीतील खाणावळीत आग लागण्याची घटना शनिवारी दुपारी 2 च्या सुमारास घडली. या आगीत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसली तरी खाणावळीतील साहित्य जळून खाक झाले आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचलेल्या कळंबोली वसाहतीतील सिडकोच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी अगीवर नियंत्रण मिळवले आहे. दर वर्षी उन्हाळ्याच्या दिवसात आगीच्या घटनानमध्ये वाढ होत असते. पनवेल पालिका हद्दीत देखील आगीच्या घटना वाढ झाल्याचे पहायला मिळत असल्याने अग्निशमन विभागाकडून आशा आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

Exit mobile version